‘आँख मारे’वर थिरकले राष्ट्रवादीचे खा. मधुकर कुकडे,व्हिडीओ झाला व्हायरल

भंडारा – राष्ट्रवादीचे खासदार मधुकर कुकडे यांनी ‘आँख मारे’ या गाण्यावर एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत चांगलाच ठेका धरलेला पाहायला मिळाला. मधुकर कुकडे हे भंडारा-गोंदिया येथील खासदार आहेत. कुकडे यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चौफेर टीका आता होऊ लागली आहे.

29 डिसेंबरला गोदेगाव तालुक्यातील एका आदिवासी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान खासदार मधुकर कुकडेंनी डान्स केला. मग 5 जानेवारीला मोहाळी तालुक्यातील एका ज्युनिअर कॉलेजच्या कार्यक्रमातही कुकडेंनी पुन्हा आपलं डान्स कौशल्य दाखवलं. हे दोन्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.

स्टेजवर  कुकडे पहिल्यांदा हळूहळू जाग्यावरच डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर ते डान्स करणाऱ्या विद्यार्थांमध्ये मिसळून ठेका धरतात. कुकडे यांना ठेका धरताना पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले.