राजकीय चक्रव्युहात अडकलेल्या मोहिते पाटिल समर्थकांचा थेट शरद पवारांना इशारा

blank

माढा: माढा लोकसभेत निवडणुक लढवण्याबाबत विचार करुन नंतर सांगतो असे सुचक वक्तव्य खा. शरद पवार यांनी केल्यानंतर मोहिते पाटिल समर्थक पवार यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. सोशल मिडीयात शरद पवार यांच्यावर प्रश्नांचा पाऊस मोहिते पाटिल समर्थक करताना दिसत आहेत. विजयदादांची ऊमेदवारी कापली तर याचे परिणाम वेगळे होऊ शकतात असाही इशारा दिला जात आहे. तसेच विजय दादांनी भाजपातुन निवडणुक लढवा असा सल्ला देखील दिला जात आहेत.

२००९ साली पंढरपुर विधानसभेत भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटिल यांचा दणक्यात पराभव केला होता. त्या पराभवानंतर देखील शरद पवार यांनी 2014 ला लोकसभेचं तिकीट दिले. गटतट विसरुन करमाळा व माढा यातील नेत्यांनी मोहिते पाटिल यांना निवडुण दिले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकित मात्र मोहिते पाटिल यांना गटबाजीचे चांगलेच ग्रहण लागले. त्यामुळे जिल्हा परिषद सत्ता देखील मोहिते पाटिल यांना गमवावी लागली. राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडुण आलेले असतानाही मोहिते पाटिल यांना जिल्हा परिषदेवर सत्ता राखणात अपयश आले.

करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल , माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे , माजी आमदार तसेच पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिपक आबा साळुंखे , आ. भारत भालके तसेच स्वतंत्र आघाडी करुन जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवलेले संजय शिंदे यांची भुमिका मोहिते पाटिल यांना महतावाची ठरणार आहे. करमाळ्यात गत विधानसभेत मोहिते पाटिल यांनी पक्षाच्या ऊमेदवार असलेल्या रश्मी बागल यांना मदत न करता शिवसेना ऊमेदवार नारायण पाटिल यांना केली असा आरोप रश्मी बागल यांचे समर्थकांकडून कायम करण्यात येतो. तर शिंदे व मोहिते पाटिल शत्रुत्व हे राज्याला माहित आहे.

मोहिते पाटिल यांना ऊमेदवारी दिल्यास लोकसभा आपण लढवणाऱ असल्याची भुमिका त्यांचे पांरपारिक विरोधक संजय शिंदै यांनी घेतली आहे. त्यामुळै मोहिते पाटिल सध्या मोठ्या राजकिय चक्रव्युहात अडकलेले दिसत आहेत. सोलापुर जिल्ह्यातील गटबाजी थांबवण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनाही अधुनमधुन चेक करण्याचा पाँवरफुल फाँरम्युला पवार वापरताना दिसत आहेत. जोपर्यंत ऊमेदवारी फाँर्म भरताना ऊमेदवार समोर येत नाही तोपर्यंत तिकीट कोणाला हे गुलदस्त्यात आहे.