शिरूर, मावळचं ठरल ! पण माढ्याचा तिढा कायम…

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता प्रत्येक पक्ष जोरदार तयारी लागला आहे. तर राष्ट्रवादी कडून दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मावळ मधून पार्थ पवार , शिरूर मधून अमोल कोल्हे , बीड मधून बजरंग सोनावणे , नाशिक मधून समीर भुजबळ , तर दिंडोरी मधून धनराज महाले यांची वर्णी लागली आहे. मात्र बहुचर्चित असणारी माढा मतदार संघाची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

या निवडणुकीमध्ये मावळ , शिरूर आणि माढा या मतदार संघातून राष्ट्रवादी कडून कोण लढणार अशा चर्चा रंगत होत्या. पण राष्ट्रवादी कडून यावेळेस नवीन दमाच्या आणि युवा नेत्यांना या मतदार संघातून संधी देण्यात आली आहे. मावळ मधून लोकसभेला पार्थ पवार लढणार आहेत तर शिरूर मधून अमोल कोल्हे यांच्याकडे जबादारी सोपवली आहे. तर शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी कडून अद्याप माढा लोकसभा मतदार संघा विषयी निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे माढ्याचा तिढा कायम आहे.

दरम्यान गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अकरा मतदार संघाच्या उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, सुनील तटकरे तसेच उदयनराजे भोसले यांच्या नावांचा समावेश आहे.Loading…
Loading...