राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी एका महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री/प्रधानमंत्री सहायता निधीत’ जमा करणार

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे  लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. आता अश्या गरीब गरजू व्यक्तींसाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाचे राज्यातील सर्व लोक प्रतिनिधी एका महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ आणि राष्ट्रीय पातळीवरील लोक प्रतिनिधी आपले वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’मध्ये जमा करणार आहेत असे पत्रक काढले आहे.

काय आहे पत्रकात –

Loading...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे.

एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’साठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत.

– शरद पवार
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

हेही पहा –

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका