मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांनी घेतली मागासवर्ग आयोग अध्यक्षांची भेट

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज राष्ट्रावादी कॉंग्रेस आमदारांच्या बैठकीच आयोजन करण्यात आल होत, या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेत निवेदन दिले आहे.

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण आंदोलन धुमसत आहे, शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला आता अनेक ठिकाणी हिंसक वळण लागताना दिसत आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांकडून आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडल जात आहे.

आज याच मुद्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रावादी कॉंग्रेस आमदारांच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं होत. बैठकीनंतर प्रमुख नेत्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले आहे, तसेच राज्यातील परिस्थितीबाबत अवगत करण्यात आले.