मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याला अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या टिप्पणीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी देखील तीव्र शब्दात या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे.
जितेन गजारीया (Jiten Gajaria) याने रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी याचा निषेध करत थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या, हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावं वाटतं, अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर तसेच भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रश्मी ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विटनंतर भाजपच्या जितेन गजारिया यांना नोटिस
- नाना पाटेकरांची मिमिक्रि करणाऱ्या कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न ; जाणून घ्या प्रकरण
- चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली विधानपरिषद सदस्य पदाची शपथ; म्हणाले…
- ‘सुरक्षा त्रुटी’, मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; सांगितला पंजाबमधील घटनाक्रम
- शरद पवारांच्या भेटीनंतर लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<