NCP on Eknath shinde | मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ज्योतिषाचा सल्ला घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बुधवारी शिर्डी दौऱ्यावर आल्यानंतर एका ज्योतिषाचा सल्ला घेतल्याचा आरोप आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना गोवण्याचा हा विरोधकांचा डाव असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या उद्योगमंत्र्यांनी सांगितले. यावर राष्ट्रवादी काँग्रसच्या नेच्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती अजून तरी इतकी अस्वस्थ बघितलेली नाही. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची भाजपाच्या मदतीने अट्टहासाने मिळवली. परंतु आता ही खुर्ची स्थिर राहील की नाही. ती अस्वस्थता त्यांच्या वागण्यातून, देहबोलीतून जाणवते. बुडत्याला का काडीचा आधार म्हणून येथे देवाला जा.. कामाख्याला जा, ज्योतिषकडे जा.. असे सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी केली.
यापेक्षा मुख्यमंत्री पदाचे महत्त्व जाणतं चांगल काम करा. लोकं पुन्हा निवडून देतील. पण असे न करता लोकांना ढिगभर आश्वासन देयची आणि कोणतीच पूर्तता करायची नाही. यामुळे विश्वासार्हता राहत नाही. भविष्य बघण्यापेक्षा किंवा पुन्हा कामाख्या देवीला जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाला योग्य न्याय द्यावा, असे मत विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले. कामाख्या देवी जादूटोणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखे असे त्या ठिकाणी जाणे व जादूटोणा यांसारख्या गोष्टीला प्रोत्साहन देणे योग्य नाही. मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती असे जादूटोणा, मंत्र तंत्र असे करत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला ते मान्य होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
एकनाथ शिंदेंचा सत्तायोग लिहिला गेला नाही – संजय राऊत
महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जंतरमंतर आणि ज्योतिषी यांच्याभोवती फिरण्यापासून वेळ मिळत नाही. ज्यांच्यात आत्मविश्वास नसतो, तेच इकडे तिकडे हात आणि कुंडली दाखवतात. मला देखील ज्योतिषाचा अभ्यास आहे. येत्या काळात एकनाथ शिंदेंचा सत्तायोग लिहिला गेला नाही. जनतेने त्यांची भावी कुंडली लिहिली आहे. जे अघोरी विद्येत गुंततात त्यांनी हे जाणून घ्यावे की अघोरी विद्येत अडकलेल्यांचा अंत भयानक आहे. त्यांचा अंतही अघोरीसारखाच होईल, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | “बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Sanjay Raut | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान स्क्रिप्टेड, यामागे मोठं षडयंत्र”, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
- BJP | “याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज?”; उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत भाजपचा खोचक सवाल
- Shikhar Dhawan | अर्धशतक करत, शिखर धवनने लिस्ट-ए करियरमध्ये पूर्ण केल्या 12 हजार धावा
- Sanjay Raut | “त्यांचा अंतही अघोरीसारखाच होईल” ; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला