‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉक्टरांच्या ‘ सख्खे शेजारी ‘ नाटकाने मिळवली वाहवा !

पुणे : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त ‘राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल’ पुणे च्या वतीने डॉक्टरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉक्टरांचा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . डॉक्टरांनी एकत्र येऊन सादर केलेल्या ‘सख्खे शेजारी ‘ या नर्मविनोदी नाटकाने उपस्थितांची वाहवा मिळवली . डॉ दीपक मांडे दिग्दर्शित या नाटकात पुण्यातील दंतरोगतज्ज्ञांनी भूमिका केल्या .

हा सन्मान सोहळा रविवार, दिनांक १ जुलै २०१८ रोजी रात्री १०:३० वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे . आयोजित करण्यात आला होता . खासदार वंदना चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या . ‘साई स्नेह हॉस्पिटल’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल’चे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी प्रास्ताविक केले .

Loading...

खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सामाजिक कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला . डॉ . जयंत नवरंगे ,डॉ . ओमप्रकाश जाधव ,डॉ . ज्ञानेश्वर दुसाणे ,डॉ . श्रीहरी ढोरे -पाटील ,डॉ . सुनील घागरे ,डॉ . प्रकाश महाजन ,डॉ . विलास पाठक ,डॉ . दीपाली पाठक ,डॉ . रमेश भानगे ,डॉ . कल्पना भानगे यांचा सन्मान स्मृतिचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या . राहुल सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले . कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ . नरेंद्र काळे ,चेतन तुपे ,एड . भगवानराव साळुंखे ,रुपाली चाकणकर ,उमेश पाटील ,डॉ . दत्तात्रय गायकवाड ,नगरसेवक योगेश ससाणे ,
डॉ. अजितसिंह पाटील, डॉ. सिद्धार्थ जाधव – (राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष), डॉ. राजेश पवार (कार्याध्यक्ष), डॉ. हेमंत तुसे – (राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल, सचिव) उपस्थित होते .

यावेळी बोलताना खा . वंदना चव्हाण म्हणाल्या ,’रुग्णांच्या दृष्टीने डॉक्टर हा परमेश्वर असतो . मात्र ,डॉक्टरांच्याच समस्या निर्माण होतात ,वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या निर्माण होतात,तेव्हा त्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर सेलने प्रयत्न केलेले आहेत . ‘

डॉ . नरेंद्र काळे म्हणाले ,’आरोग्य क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर सेलच्या पाठपुराव्यामुळे अनेक चांगले निर्णय झाले . डॉक्टर संरक्षण कायदा ,पॅरामेडिकल कौन्सिल ,होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपॅथी उपचारास परवानगी असे अनेक निर्णय घेतले गेले . मात्र ,सध्याच्या काळात डॉक्टरांवरील हल्ले वाढत चालली असून ती काळजीची बाब आहे ‘

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'