राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, ‘इंडियन ऑईल’च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी

सोलापूर : राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालक मंत्री अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उच्च स्तरीय नेते दिलीप वळसे-पाटील जिल्ह्याच्या दौर्यावर असतानाच राष्ट्रवादीचेच प्रदेश प्रवक्ते जि.प.सदस्य उमेश पाटील यांची गुुंडगिरी समोर आली आहे. त्यांनी नरखेड भागात काम करत असलेल्या इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना ’तुम्हारे बाप का गॉंव है क्या?’ अशी विचारणा करत यथेच्छ बडवले आहे. हाताने चापटांचा मार आणि तोंडाने शिव्यांचा भडिमार करतानाचा पाटलांचा व्हिडिओच समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

मोहोळ तालुक्यातील नरखेड परिसरात इंडियन ऑईल कंपनीच्यावतीने भूमिगत पाइपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर आणि कामगार काम करत आहेत. या कामावर या भागाचे जिल्हा परिषद सदस्य असणारे उमेश पाटील आपल्या समर्थकांसह गेले. त्याठिकाणी स्वत:च्या गाडीतून उतरताच पाटलांच्या अंगात वीरश्री संचारली. ते अतिशय रागाने आणि तावातावाने एका जीपगाडीकडे जाताना व्हिडिओमध्ये दिसतात. जीपचा दरवाजा उघडून आतमध्ये बसलेल्या इंडियन ऑर्इल कंपनीच्या एका अधिकार्याला पाटलांनी गाडीतच मारहाण केली. शिव्यांवर शिव्या आणि चापटांवर चापटा बसत असल्यामुळे जीपमधील अधिकारी खाली उतरूच शकला नाही.

Loading...

जीपमधील धुलाई झाल्यानंतर पाटलांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. ही मारहाण पाहून स्वत:ला वाचवण्यासाठी पळून जाण्याच्या तयारीत असणार्या दुसर्या एका कर्मचार्याच्या कानाखाली पाटलांनी सपासप आवाज काढला. त्याने मार वाचवण्यासाठी स्वत:चे दोन्ही गाल झाकण्याचा प्रयत्न केला असता एक हात पिरगाळून पाटलांनी पुन्हा चापटांचा प्रसाद दिला.

तुम्हारे बाप का गॉंव है क्या?

‘तू कहॉं से आया? तू यहॉं क्यूं आया? यह तुमारे बाप का गॉंव है क्या…?’ अशी विचारणा करत उमेश पाटील यांनी याठिकाणी हाणामारी केली आहे. यावेळी त्यांनी इंडियन ऑईलचे अधिकारी आणि कर्मचार्यांच्या आईवडिलांचाही चांगलाच उध्दार केला. मार खाणारे ‘ नही दादा… नही दादा…’ असे म्हणत असतानाही उमेश पाटलांनी जास्तच मारहाण करत आपली दादागिरी दाखवल्याचे या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.

मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडियन ऑईल कंपनीच्या साईटवर काम करणारे सिव्हिल इंजिनिअर मिरज नागनाथ पाटील(रा.टेंभुर्णी, ता. माढा), दिनदयालकुमार सुनील चौधरी, ज्वार व सरवण कुमार यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उमेश पाटील यांच्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.

उमेश पाटलांडून नो रिस्पॉन्स

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी रात्री उमेश पाटील यांना त्यांची बाजू ऐकण्यासाठी संपर्क साधला असता सुरूवातील त्यांचा. मोबाईल व्यस्त लागत होता. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या फोनवर रिंग वाजत होती. मात्र त्यांनी फोन स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. मात्र या व्हिडिओमुळे शनिवारी दिवसभर उमेश पाटील हे टीकेचे धनी बनले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात