VIDEO- मुख्यमंत्री पदाबाबत सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत

टीम महाराष्ट्र देशा- आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास सुप्रिया सुळे ह्या मुख्यमंत्री होतील असा अंदाज राजकीय चाणक्याकडून वर्तवला जातो. मात्र २०१९ मध्ये राष्ट्रवादीच सरकार आल तरी आपण मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नसल्याच खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनीच स्पष्ट केलं आहे. तसेच २०१९ मध्ये आपण लोकसभा निवडणूकच लढवणार असल्याचही त्यांनी सांगितल आहे. राष्ट्रीय कन्या दिना निमित्त आज सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.

सरकारमधील मंत्री न झेपणारी आश्वासन देतात
राज्य सरकारमधील सगळेच मंत्री न झेपणारी आश्वासने देतात. याच चित्र रस्त्यांवरील खड्यांवरून दिसून आल आहे. त्यामुळे आपण राबवलेल्या सेल्फी विथ पॉटहोलला राज्यातील सर्वच जनतेन मोठा प्रतिसाद दिला.

कोणत्याही विषयावर जाहिरातीमधून बोलणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकमध्ये जाऊन चुकीची विधाने करताना काहीही बोलत नाहीत.

युवक महिलांना नौकरी देण्यासाठी स्कील डेव्हलपमेंटच्या केवळ गप्पाच मारल्या जातात. यासाठी प्रधानमंत्री किंव्हा मुख्यमंत्री देखील काहीच प्रयत्न करताना दिसत नाही. स्कील डेव्हलपमेंटच्या केवळ जाहिरातीच दिसतात मात्र खरच किती जणांचे स्कील डेव्हलप झाले हे कळत नाही.

महागाई हा सर्वात गंभीर प्रश्न बनला आहे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल साडेचार कोटी रुपयांची स्वतची जाहिरात करत आहेत. अशा गोष्टीवर पैसा खर्च करण्यापेक्षा सरकारने राज्यातील शाळा वाचवण्यासाठी. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वापरायला हवा.Loading…
Loading...