सरकार पाडण्याचे उद्धव ठाकरेंचे दावे हास्यास्पद – सुप्रिया सुळे

Supriya-Sule

रत्नागिरी: रत्नागिरीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मुळावर कोण येणार असेल, तर सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा दिलेला इशारा हास्यास्पद आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने रत्नागिरी जिल्ह्यात खेड, मंडणगड ते दापोली असा आक्रोश मोर्चा आज काढला. त्याकरिता सुळे खेडमध्ये दाखल झाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यक्रमा दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकता राहिली नाही. भारतीय जनता पार्टींचे सगळेच नेते बाजारातल्या विक्रीची वस्तू म्हणून सगळ्याच पक्षाच्या लोकांकडे बघत आहेत. हा महाराष्ट्रातील समस्त जनतेचा अपमान आहे. भाजपचे नेते सेनेचे आमदार फोडण्याची भाषा करतात. ही कमोडिटी पद्धतीची भाषा झाली. साबण, तेलाच्या बाटलीप्रमाणे माणसे विकत घेण्याची भाषा चुकीची आहे. अशा घाणेरड्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. मी लाभार्थींच्या जाहिरातीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे. परंतु कर्जमाफीसाठी नाही. तीन वर्षे सरकार शेतक-यांची फसवणूक करीत आहे. कोकणातील शेतक-यांच्या शेती, बागायतींच्या नुकसानीचे पंचनामे करूनही नुकसानभरपाई मिळत नाही. युती शासनाच्या तीन वर्षांच्या काळात अन्याय झाला आहे. आक्रोश मोर्चांच्या निमित्ताने कोकणात फिरताना अनेकांची याबाबत निवेदने माझ्याकडे आली. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस कोकणातील शेतक-यांच्या पाठीशी भक्कम उभी राहील, अशी ग्वाही सुळे यांनी यावेळी दिली.

Loading...

राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात आक्रोश मोर्चांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली