बुलेट ट्रेन म्हणजे न विचार करता घेतलेला निर्णय- शरद पवार

नगर : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काहीच फायदा नाही. उलट बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातला जास्त होणारे मात्र महाराष्ट्राच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडणार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे रविवारी अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी हे विधान केले आहे.

पुढे बोलताना शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला चांगल फटकारल आहे. सरकारने कर्जमाफीचे अश्वासन दिले आहे. पण ते कधी पूर्ण होणार हे सांगता येत नाही. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या अश्वासनातील संपूर्ण हा शब्द आता गेला आहे. तसेच दररोज नवनवे आदेश काढले जात आहेत. त्यामुळे भाजपची कर्जमाफी म्हणजे केवळ लबाडा घरच आवताण असल्याच पवार म्हणाले आहेत.

You might also like
Comments
Loading...