शिवसेनेच्या माकडांच्या धमकीला बीडमधील बारीक पोरगंही भीत नाही : संदीप क्षीरसागर

बीड : दै.सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अग्रलेखातून टीका करताना अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली होती. त्या अग्रलेखाचे पडसाद सोमवारी (दि.29) बीडमध्ये दिसून आले. राष्ट्रवादीचे संदिप क्षीरसागर यांच्यासह समर्थकांनी उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत नगर रोडवरील शिवाजी चौकात उद्धव ठाकरे यांचा साडी-चोळी घातलेला पुतळा जाळला. यावेळी संदिप क्षीरसागर यांनी पुतळ्याला कोल्हापुरी चप्पलचे फटके मारुन सदर लेखाचा निषेध केला. यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणूण गेला होता.

शिवसेनेच्या काही माकडांनी ज्यांना कवडीची किंमत नाही आशनी अजित दादा पवार यांना बीडमध्ये आल्यास जिवंत जाळू अशी भाषा वापरली. त्यावर संदीप क्षीरसागर यांनीही खांडे यांच्या धमकीला बीडमधील बारीक पोरगंही भीत नाही. पवारांचे सोडा आधी आमच्यासमोर येण्याची हिंमत तरी तुमच्यात आहे का? आणि ऐवढीच जाळपोळीची खुमखुमी असेल तर लक्षात ठेवा, राष्ट्रवादीचा माझ्यासारखा एकटा कार्यकर्ताच तुमच्या संपूर्ण बीडच्या शिवसेनेला पुरे झाला, असे प्रत्युत्तर देत शिवसेनेच्या वाघाच्या सध्या मांजरी झाली असल्याने बीडच्या शिवसेनेसह राज्यातल्या शिवसेनेला राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच पुरुन उरतेल त्यामुळे शिवसेनेच्या नेते मंडळींना राज्यात फिरणं मुश्कील होईल असा इशाराही संदीप क्षीरसागर यांनी दिला.

Loading...