fbpx

मोदींना हद्दपार केल नाही तर पुन्हा ‘भीमा कोरेगाव’ घडेल – सलगर

उस्मानाबाद: मोदी आणि भाजपला हद्दपार केले नाही तर पुन्हा एकदा भीमा कोरेगाव घडेल, अशी टीका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केला आहे. भाजपच्याच काळात भीमा कोरेगाव घडले, कोणामुळे कशामुळे घडले, दलितांना जगण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न यावेळी सलगर यांनी केला आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या सभेच आयोजन करण्यात आलं आहे, यावेळी बोलताना सलगर यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

१९९३ साली मराठवाडा नामविस्तारावेळी शिवसेनेन काय नारा दिला होता हे लोकांनी लक्षात घेयला हवं, त्यावेळी पवार साहेबांना सहकाऱ्यांनी सत्ता जाण्याची भीती व्यक्त केली होती, मात्र महामानवाच काम जगात उल्लेखनीय आहे. त्यामुळे नाव दिलच पाहिजे, असं त्यांनी सांगितल. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्यात आल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला.