NCP | मुंबई : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून .मनोज गरबडे, विजय ओव्हाळ, धनंजय इजगज तिघांना अटक केली आहे. दरम्यान पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट शेअर करत मनोज गरबडे (Manoj Garbade) यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केली असल्याचा दावा केला आहे.
“मनोज गरबडे यांच्या शाईफेकिचे समर्थन नाही पण त्यांनी केलेले हे कृत्य व्यक्तिगत स्वार्थासाठी केले नसून महापुरुष सन्मानासाठी केले आहे हे लक्षात घ्यावे. खोट कलम लावून त्याला आयुष्यातून उठवण्याचा कुणाचा डाव असेल तर शिवभीमसैनिक यांचा तांडव महाराष्ट्र पाहिल”, असा इशारा रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी दिला आहे.
तसेच आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी सुनावलं देखील आहे. “चुक की बरोबर कायदा ठरवेल, वाचळवीर आ.राम कदम मनोज गरबडेला घरात घुसून मारण्याची भाषा करत असतील तर शिव-भिमसैनिक कदमचा माज उतरवण्यास सज्ज आहेत”, असं त्या म्हणाल्या.
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या शिवभिमद्रोहि चंपा ला संरक्षण का? मनोज गरबडे वर तात्काळ कारवाई मग ती पुण्यात आमदारकीची भिक मिळवणाऱ्या चंद्रकांत दादावर का नाही?, असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्टमधून केला आहे. त्याचबरोबर मनोज गरबडेवर अन्याय झाला तर कायदेशीर मदत करणार असल्याचंही त्यांनी म्हंटल आहे.
दरम्यान पोलिसांकडून मनोज गरबडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावर त्या म्हणाल्या ,
खरे तर चंद्रकांत पाटील हे एका स्थानिक कार्यकर्त्याच्या घरातून बाहेर पडताना हा शाईफेक झाली. मग तिथे कुठले सरकारी काम होते?, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय. निव्वळ मोघम आणि बेकायदेशीर कलम लावले असल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “निर्भया फंडांतून घेतलेल्या पोलीस गाड्यांचा वापर फुटीर आमदारांच्या…”; जयंत पाटलांचा दावा काय?
- Jitendra Awhad | चंद्रकांत पाटील यांच्या विषयी केलेलं ‘ते’ ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं डिलीट; चर्चांना उधाण
- Ajit Pawar | “मी कधीतरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना नक्की विचारेन की…”; अजित पवारांची बोचरी टीका
- Rohit Pawar | “चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य योग्य नव्हतंच, पण शाईफेक…”; रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
- Ishan Kishan | बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावत इशान किशनने मोडले ‘हे’ विक्रम