Share

NCP । “पन्नास खोके घेतल्याने बोके माजलेत”; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदे गटावर घणाघात

NCP । मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन बंड पुकारत भाजप पक्षासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते सतत शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, टीका करत आहेत. शिंदे गटाला गद्दार म्हणून हिणवण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.

पन्नास ‘खोके’ घेतल्याने बोके माजले असल्याचं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. या आमदारांनी शिवसेना फोडण्यासाठी भाजपाकडून ‘खोके’ घेतल्याचं शेंबडी पोर सुद्धा बोलत असल्याचं त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. “लग्नात गेलं की किती ‘खोके’ घेतल्याचं विचारतात, असं बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी सांगितलं. खोके घेणारे सुषमा अंधारेंना खोके घेतल्याचं विचारत आहेत”,असंही त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर ४० आमदार आणि राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कुरघोडी करत आहेत. मात्र त्याला सुषमा अंधारे पुरुन उरल्या आहेत, असेही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हंटल आहे.

दरम्यान,  “महाराष्ट्रातील राजकारणाच्या संस्कृतीचे ईडी सरकारकडून धिंडवडे काढले जात असून, याचा प्रत्यय सातत्याने येत आहे.” त्याचबरोबर सुषमा अंधारेंचं भाषण आवडत नाही म्हणून ते करुन द्यायचं नाही. यासाठी पोलिसांचा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही रुपाली पाटील यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

NCP । मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन बंड पुकारत भाजप पक्षासोबत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now