Rupali Patil | मुंबई : भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा समस्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी आज (१७ डिसेंबर) महामोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे गटाला टोला लगावत मनसेचाही समाचार घेतलाय. त्या म्हणाल्या, “भाजपाने महाविकास आघाडी सत्तेत असताना शिंदे गटाला विकास की सत्तेसाठी फोडलं?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्हाला सांगावे गुवाहाटीला कशासाठी गेला होता?, कोणते विकासाचे राजकारण मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं?.
“आपण हिंदुधर्मासाठी गेला मग राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य केलं, तेव्हा आळीमिळी गुपचिळी करून का बसलात?, अशी टीका रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. भाजपाचे भा** प्रत्येक क्षेत्र बदनाम करत आहेत, तरीही मुख्यमंत्री शिंदे शांत बसले आहेत, असंही त्या म्हणाल्या.
“मुख्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार स्वत:वर ईडी आणि सीबीआयची कारवाई होऊ नये, म्हणून भाजपाबरोबर गेले आहेत. हे सर्व जगजाहीर आहे”, असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला. मनसेची परिस्थिती अशी झाली की काय सोडायचं आणि काय धरायचं, असा चिमटाही रुपाली पाटील यांनी काढलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Shambhuraj Desai | हिवाळी अधिवेशन संपताच बेळगावात जाऊन चर्चा करु – शंभूराज देसाई
- Nana Patole | “भाजपाचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”; नाना पटोलेंचा घणाघात
- Bacchu Kadu | महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू
- Gulabrao Patil | “ताई कशी काय बोलते गं, थोडी लाज…”; गुलाबराव पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका
- Sharad Pawar | “उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल समाधान, पण…”; शरद पवार नेमकं काय म्हणाले?