आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत – रुपाली चाकणकर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर बोलावून तरुणाला मारहाण केल्याचा भाजपानं आधीच निषेध नोंदवला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आव्हाडांच्या या कृतीचे समर्थन केले आहे. आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अस म्हणत रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठींबा दिला आहे.

योग्यच केलं….आम्ही सोबत आहोत. खुप दिवस सहन केली, या सडक्या मेंदुच्या विचारांची घाण . महिला म्हणून राजकारण करताना मीदेखील खुप जवळून अनुभवतेय…मी एखादी प्रतिक्रिया दिली तर त्यावर वैचारिक मत मांडावे ते मला मान्य आहे. पण असं होताना दिसत नाही, एखादी महिला स्वतःच्या कर्तृत्वाने नेतृत्व स्विकारत असेल,विचार मांडत असेल, तिची कार्यप्रणाली समृद्ध होत असेल ,आणि तिच्यावर टिका करण्यासारखं हातात काहीच नसेल तर ,तर तिच्या चारिञ्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहिर कार्यक्रम सोशल मिडीयाच्या माध्यमातून होतो. अस रुपाली चाकणार म्हणाल्या आहेत.

एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करतो कारण समाजात चार दोन सडकी असणार हे गृहीत धरूनच चालतो पण त्याचा परिणाम कुटुंबांवर होत असतो. मला अनेक वेळा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टिका झाली.माझे कार्यकर्ते या हितचिंतकांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरं देत असतात, पण खंतही वाटते जेव्हा मुलगा म्हणतो, मम्मी, नाराज नाही ना तु?लक्ष नको देऊ या लोकांकडे. तु काम करत रहा. अस म्हणत रुपाली चाकणकर यांनी खंतही व्यक्त केली आहे.

तर, माझं कुटुंब, माझा मिञपरिवार, माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत ,म्हणून मी बिनधास्त काम करत रहाते. लढत रहाते या क्षुद्र विचारांच्याविरोधात. पण समाजातील प्रत्येक क्षेत्रातील महिला आहेत, ज्यांना या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ञास होतो.त्यांना सहकार्य करणारे बरोबर नाही, त्यांच्याकडे या अन्यायाच्या विरोधात लढण्याची क्षमता नाही….त्यांनी कोणाकडे आणि कितीदा न्याय मागायचा.? आता सुरूवात झालीच आहे तर होऊन जाऊ देत. आव्हाडसाहेब… आम्ही सोबत आहोत. असा पाठींबा त्यांनी आव्हाड यांना दिला आहे.