इंदुरीकरांनी प्रबोधनातून स्त्री – जन्माचा विचार रुजवावा, टीका झाली म्हणून प्रबोधन करणे सोडू नये 

शिर्डी : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच त्यांनी या सर्व वादावर काल रात्री केलेल्या किर्तनात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले आहेत. “यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही”, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. या किर्तनात इंदुरीकरांनी सर्व प्रकरणाचा रोष यूट्यूब चॅनलवर व्यक्त केला.

Loading...

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलताना इंदुरीकरांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ कोणताही कीर्तनकार, प्रबोधनकर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला एक दिशा देत असतो. मात्र इंदुरीकर महाराज आपल्या प्रबोधनातून महिला मुलींवर उपहासात्मक आणि अपमानास्पद टीका करत असतात. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. या पाम्पारेतून त्यांनी चांगले विचार समाजात रुजवायला पाहिजेत. मात्र प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी संतांचा विचार मांडला पाहिजे.’

तसेच इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून स्त्री – जन्माचा विचार समाजात रुजवायला पाहिजे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये हि स्त्रियांचा सन्मान आणि आदर राखण्याचा विचार मांडायला हवा. स्त्री जन्माची धुरा त्यांनी समाजात रुजवणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्यावर टीका झाली म्हणून त्यांनी कीर्तन सोडण्याची गरज नाही, असेही त्यांनी महाराष्ट्र देशा’ला यावेळी सांगितले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन