रोहितदादा आमच्या गावातून कोरोनाला घालवाना..! एका चिमुरडीचे रोहित पवारांना पत्र

rohit pawar

नगर : कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. अनेक गावच्या गावं आज सील करण्यात आली आहेत. त्यामुळे आष्टी येथील एका चौथीत शिकणाऱ्या मुलीने कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांना पत्र लिहीत आमच्या गावातील कोरोनाला भीती दाखवून घालवून टाका, असे भावनिक पत्र लिहिले आहे.

मृण्मयी विकास म्हस्के असं बीडमधील आष्टी तालुक्यातील आष्टा गावात राहणाऱ्या या चिमुकलीचं नाव आहे. मृण्मयी सध्या चौथीत शिकत असून तिने आपल्या हाताने आमदार रोहित पवार यांना पत्र लिहीत अनोखी मागणी केली आहे.

blank

प्रिय रोहितदादा, तुम्ही जामखेडमधून जसा कोरोना घालवला तसा आष्टीमधून पण घालवा ना…,अशी मागणी मृण्मयीने रोहित पवारांकडे केली आहे. तसेच या पत्रात मृण्मयीने वडिलांशी झालेल्या बतचीतीचा हवाला दिला. तिने वडिलांना विचारलं, पप्पा, प्रत्येकजण कुणाला तरी घाबरत असतो, तसा कोरोनापण कुणालातरी घाबरत असेलच ना? यावर तिच्या वडिलांनी कोरोना रोहितदादाला, डॉक्टरांना आणि पोलिसांना घाबरतो, असं उत्तर दिलं.

दरम्यान रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यानंतर प्रशासन पातळीवर कठोर अंमलबजावणी केल्याने इथला कोरोना नियंत्रणात आला. त्याचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवत मृण्मयीने अनोखी मागणी रोहित पवार यांच्याकडे केली आहे. आता ही मागणी रोहित पवार मनावर घेणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.