अहो चंद्रकांतदादा… फिल्ड वर काम करणारे डॉक्टर्स, पोलीस हे काय गोट्या खेळत होते का ?

dhandrkant patil - dharawi

बीड : कोरोनाने देशासह महाराष्ट्र राज्यातील कहर हा सुरूच ठेवला आहे. तर यामुळे, राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊन मध्ये जात आहेत. या परिस्थितीत एक सुखद घटना म्हणजे, धारावी या सर्वात मोठ्या हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा आता आटोक्यात आला आहे. यानंतर आता राजकीय श्रेयवाद चांगलाच रंगला आहे.

धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत. ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी ‘धारावी’ कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण याचं श्रेय सरकारचं नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रेखा फड यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘काय बोलताय चंद्रकांत दादा ठीक आहे RSS च्या स्वयंसेवकांच कौतूकच.. म्हणून काय प्रशासन आणी सरकारने काहीच केलं नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता ? फिल्ड वर काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, त्यांचा सपोर्टिग स्टाफ, पोलीस बांधव, आशावर्कर हे काय गोटया खेळतं होते कां ? काय आणी कुठे श्रेय घ्यावे, कठीण परिस्थितही तुम्ही श्रेय घ्यायला विसरत नाहीत.. बहूतेक भाजपच्या लोकांची कुठल्याही आयत्या कामावर श्रेय घेण्याची परंपराच आहे असे दिसतेय’ अस ट्विट करत फड यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, काल, भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील सरकारवर निशाणा साधला होता. ‘आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनतर करुन मदत केली, तिथल्या लोकांची जनजागृती केली. धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही. WHO ने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे, त्यांना दिलं असतं तर समाधान वाटलं असतं,’ अशा शब्दांत सरकारवर टीका केली होती.