Share

NCP | “हे सरकार स्वतःच्या आनंदाची दिवाळी साजरी करतंय”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

NCP | अहमदनगर : सध्या राज्यातील रायकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसून येतं आहे. सतत सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली असते. अशातच ‘100 रूपयांमध्ये दिवाळीचा शिधा’ या योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाले राष्ट्रवादी पक्षाचे नीलेश लंके (NCP)

सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याचे जाहीर केले मात्र, अजूनही अनेक गरिबांच्या घरी आनंदाचा शिधा पोहचू शकला नाही, त्यामुळे आनंदाचा शिधा न मिळाल्याने अनेक गोरगरीब जनतेची दिवाळी अंधारतच साजरी होत आहे, असं म्हणत नीलेश लंके यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. नीलेश लंके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

तसेच, परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी देखील, नीलेश लंके यांनी केली आहे. त्याचबोरबर लंके यांनी या सरकारचा निषेध करत हे सरकार स्वतःच्या आनंदाची दिवाळी साजरी करत असल्याचा आरोपही केला आहे.

दरम्यान, ‘100 रूपयांमध्ये दिवाळीचा शिधा’ या योजनेवरून राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज्य सरकारवर टीका केली होती. योजना राबवत असताना त्याचं व्यवस्थित नियोजन करावंच लागतं. नियोजनशून्य कारभार केला, की अशा समस्या निर्माण होतात. काही गोष्टी आहेत, काही नाहीत. दिवाळी झाल्यानंतर सवलतीच्या दरातला शिधा मिळाला तर त्याचा काय उपयोग आहे? त्यांचे मंत्री सांगतायत की पोहोचलाय. पण अजिबात पोहोचलेला नाही. काहींनी सांगितलं की त्याचा काळा बाजार सुरू आहे. 100 रुपयांमधला शिधा कुणी 200 किंवा 300 रुपयांना विकत आहे. हे चुकीचं आहे. त्यात बारकाईनं लक्ष देण्याची गरज असल्याचं पवारांनी म्हटलं होतं

महत्वाच्या बातम्या :

NCP | अहमदनगर : सध्या राज्यातील रायकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसून येतं आहे. सतत सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now