गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले – नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. बालकांच्या हत्या, बालकांवरील बलात्कार,अपहरण आणि गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

Loading...

राज्यात बालकांवरील बलात्कार, अपहरणाच्या अनेक घटना घडत आहेत. या प्रकरणांवरून नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात बालकांवरील अत्याचाराबाबतच्या घटनांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे.असे नवाब मलिक यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर बालकांच्या हत्या, बालकांवरील बलात्कार,अपहरण आणि गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असेही त्यांनी म्हंटले.Loading…


Loading…

Loading...