उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांपैकी कोणाची भूमिका खरी पक्षाने खुलासा करावा; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मागणी

उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा: एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महाबळेश्वरमधील कीज रिसॉर्ट सील केल जात तर दुसरीकडे आदित्य ठाकरे नाइट लाइफ विकसित करण्यासाठी आग्रही आहेत आता यांपैकी कोणाची भूमिका खरी आहे याचा शिवसेना पक्षाने खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

Loading...

उद्धव ठाकरे हे सत्तेमध्ये सहभागी असलेले नेते आहेत. पर्यावरण विभाग देखील शिवसेनेकडे आहे. नेता तक्रार करतो तेव्हा कारवाई होते. परंतु सर्वसामान्यांनी तक्रारी केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही. सर्वसामान्यांच्या तक्रारी दुर्लक्षित करा, आम्हाला त्रास होता कामा नये अशी भूमिका राज्य सरकारची आहे का ? असा खोचक सवाल सुधा नवाब मलिक यांनी सरकारला केला आहे.

दरम्यान, महाबळेश्वरमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या त्रासामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा तक्रार केल्यानंतर कीज रिसॉर्ट सील करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...