या भेटीमागे दडलंय काय ? जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होणार असतानाच आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि भेटीचे कारण काय होते, याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. जितेंद्र आव्हाड यांनी ही सदीच्छा भेट असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आज मुंबई मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची लोकसभा जागेंच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आहे. त्याआधीच जितेंद्र आव्हाड यांनी मातोश्री गाठल्याने राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर शिवसेनेने भाजप सोबत युती करू नये यासाठी हि भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...