शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला अटी लावणाऱ्या सरकारने गुजरातच्या कंपनीचे कर्ज का माफ केले?

Jayant patil

टीम महाराष्ट्र देशा :  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारने गुजरातच्या टोरंट कंपनीवर असलेले २८५ कोटींचे थकीत कर्ज माफ केल्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला अनेक अटी लावणाऱ्या फडणवीस सरकारने मग गुजरातच्या टोरंट कंपनीवर उदार होत तब्बल २८५ कोटींचे थकीत कर्ज माफ का केले? असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गुजरातच्या टोरंट कंपनीवर कंपनीवर असलेले तब्बल २८५ कोटींचे थकीत कर्ज माफ केले. फडणवीस सरकारने टोरंट कंपनीवरचे कर्ज माफ केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक योजनांसाठी सरकारकडे निधी उपलब्ध नाही. असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला अनेक अटी लावणाऱ्या फडणवीस सरकारने मग गुजरातच्या टोरंट कंपनीवर उदार होत तब्बल २८५ कोटींचे थकीत कर्ज माफ का केले? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.