fbpx

राज्यातील महिला असुरक्षित असताना सरकारने कोणतीच कडक पाऊले का उचलत नाही? – जयंत पाटील

cm devendra fadanvis and jayant patil

टीम महाराष्ट्र देशा : महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. बेटी बचाव म्हणणाऱ्या सरकारला महिलांच्या सुरक्षेशी काही देणं-घेणं नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला सुरक्षे संदर्भात एकही पाऊल राज्य सरकारने उचलले नाही. याच मुद्यावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. गेल्या तीन वर्षातील महिला अत्याचारात होत जाणारी वाढ ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. बेटी बचाव म्हणणाऱ्या सरकारला महिलांच्या सुरक्षेशी काही देणं-घेणं नाही याचाच हा पुरावा आहे, असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, राज्यातील महिला भगिनी असुरक्षित असताना देखील फडणवीस सरकार कोणतीच कडक पाऊले का उचलत नाही? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.