पडळकर…ममतादीदीने तुमच्या बापासहित सर्वांचा जाळ अन् धूर काढला; राष्ट्रवादीच प्रत्युत्तर

बीड : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

यासोबतच, काल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल देखील जाहीर झाला असून पंढरपुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकवला आहे.

या विजयानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली होती. ‘पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ नुतन आमदार समाधान आवताडेंचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार.’ असं ट्विट करून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील चिमटा काढला होता.

पडळकर यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा फड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सगळेच पाऊस हंगामी नसतात… काही पाऊस अवकाळी असतात, तिकडे पश्चिम बंगाल मध्ये एकट्या ममतादीदीने तुमच्या बापासहित सर्वांचा धूर आणि जाळ काढला, तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहीली, अक्षरशः तुम्हाला बांगड्या भरायचा कार्यक्रम मात्र ‘ममता दीदींनी’ करेक्ट केला आहे…’ असा प्रहार रेखा फड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या