कीटकनाशाच्या विषबाधेतून शेतक-यांच्या झालेल्या मृत्युप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: मुंडे

munde

संदेश कान्हु,यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : यवतमाळमध्ये कीटकनाशाच्या विषबाधेतून शेतक-यांच्या झालेल्या मृत्यूंच्या   घटना या अतिशय गंभीर असून याबाबत दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत तसेच शेतक-यांच्या या हत्या असून यास कीटकनाशक उत्पादक कंपन्या, विक्रेते त्यांना पाठीशी घालणारे कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे

कीटकनाशकाच्या विषबाधेतून शेतक-यांच्या झालेल्या मृत्युंवरून सध्या राजकीय वातावरण तापत आहे या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी यवतमाळचा दौरा केला आणि पिडीत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली . त्यानंतर बोलताना मुंडे यांनी सरकारवर हल्ला चढवला

काय म्हणाले धनंजय मुंडे ?

Loading...

या घटनेतील मृत शेतक-यांच्या कुटुंबियांच्या तातडीने 10 लाख रुपयांची मदत करावी. त्यांचे चांगल्या रुग्णालयात उपचार करावेत. यवतमाळमध्ये कीटकनाशाच्या विधबाधेतून २० शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याची घटना अतिशय गंभीर आहेत . याबद्दल सरकारने दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, या शेतकऱ्यांच्या हत्या असून यासाठी कीटकनाशक उत्पादक कंपन्या, विक्रेते आणि त्यांना पाठिशी घालणारे कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘यवतमाळ सारख्याच घटना नागपूर, बुलढाणा, अकोलासह अनेक जिल्ह्यात होत आहेत. या घटनांची दखल घेऊन सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात,’ अशी मागणी त्यांनी केली. या घटनेतील मृत शेतकरी कुटुंबीयांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच कीटकनाशकांच्या फवारणीमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत झालेल्यांवर मुंबईत करण्यात येणार असून, याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.