भाजपच्या काळात महागाई चार पटींनी वाढली – धनंजय मुंडे

सांगली –  नरेंद्र मोदी ज्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेच्या जीवावर निवडणुका जिंकले, त्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेची आज गावागावात चेष्टा सुरु असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. ते सांगलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात बोलतं होते.

धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, “देशात नोटाबंदी, मांसबंदी करणारे हे मोदी आता आपली नसबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत” काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ‘बहुत हो गयी महगाई’ म्हणणाऱ्या भाजपच्या सत्तेत आज महागाई चार पटीने वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. ज्या तरुणांनी मोठा रोजगार मिळेल या आशेने मोदींना डोक्यावर घेतले, तीच तरुणाई 2019 मध्ये भाजपला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. अशी टीकाही मुंडेंनी यावेळी केली.

Loading...

मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे गाजर दाखवले होते. पण जनतेला अजूनही 15 लाख मिळण्याची आशा लागून राहिली आहे. पण बँकेत 15 लाख येतील हे विसरा, मोदींच्या कृपेने 15 लाखाचे कर्ज तुमच्यावर दिसले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
त्या ५० तबलिगींनी लवकरात लवकर पुढे यावे, अन्यथा....
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला 'इशारा'; मदत केली तर ठीक, अन्यथा…
निलेश राणेंचा राज्यसरकारवर घणाघात, म्हणाले....
'जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, नाहीतर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार'
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा