फडणवीस तुमचे वय काय? कर्तृत्व काय? पवार साहेबांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री महोदय जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. तुमचे गुरू आमच्या गुरूचे बोट पकडून राजकारणात आले आहेत हे बहुदा तुम्ही विसरलात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय? कर्तृत्व काय? पवार साहेबांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही. अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईत शुक्रवारी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेलाच मुंडे यांनी उत्तर दिले.

शरद पवारांविषयी बोलताना फडणवीसांनी मर्यादा बाळगावी, असा सल्लाही त्यांनी दिला. दिल्लीतून रिंगमास्टर (अमित शाह) आल्याने त्यांना खूश करण्यासाठी फडणवीसांना केवळ जनावरे दिसत होती, असा टोला त्यांनी लगावला.

You might also like
Comments
Loading...