fbpx

आमच्याकडं असलेले विरोधीपक्ष नेते तुमच्याकडे आले अन् शुद्ध झाले – धनंजय मुंडेचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : राधाकृष्ण विखेंच्या मंत्री पदावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. आमच्याकडं असलेले विरोधीपक्ष नेते तुमच्याकडे आले आणि शुद्ध झाले, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश करत त्यांना मंत्रिपद देण्यात आले. विखेंच्या मंत्रीपदावरून मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. आमच्याकडं असलेले विरोधीपक्ष नेते तुमच्याकडे आले शुद्ध झाले, आम्ही दोघांनी मिळून ताडदेव येथील एफएसआय घोटाळ्याचा प्रश्न मांडला होता, आता हेच विखे पाटील त्याच विभागाचे मंत्री झाले आहेत. त्यांनी यावर आपला बाणा दाखवावा. असे मुंडे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मुंबईच्या विकास आराखड्यात १ लाख कोटींचा घोटाळा झाला त्याचे पुढे काय झाले? की त्यामुळेच हे मंत्रिपदाचे डील झाले का ? असा सवाल करत हे महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, असे मुंडे यांनी म्हंटले.