‘तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात त्याचा भूतकाळ जाणून घ्या’, राष्ट्रवादीच्या नेत्याने तांबेंना सुनावलं

tambe

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसला डावलण्यात येतंय का? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे. महाजॉब्स पोर्टलवरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्विट करुन थेट महाविकास आघाडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला आहे. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही”, असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले आहेत.

नगरमध्ये लॉकडाऊन न केल्यास… सुजय विखेंचा थेट इशारा

“महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे” अस ट्विट करत सत्यजीत तांबे यांनी आपली खदखद व्यक्त केली.

महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या विकासाकरता सत्तेवर आलेले आहे .दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही महाजॉब योजनेद्वारे राज्यातील युवकांना रोजगार देण्याचं काम करणार आहोत. याबाबतच्या जाहिरातीत संबंधित खात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याचे फोटो टाकण्यात आले आहेत. यात नाराज होण्यासारखे काय ? तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात त्याचा भूतकाळ जाणून घ्या. माहिती घेण्याआधी सार्वजनिक मत व्यक्त करणे चुकीचे आहे, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकारी अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सत्यजित तांबे यांच्यावर केला आहे.

नगरच्या राजकारणाचा सुसंकृत किस्सा : ‘तोपर्यंत’ तरी सुजय विखे अन् संग्राम जगतापांचा याराना…