आपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या – भुजबळ

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली आहे. भुजबळांनी डान्सबार बंदीवरुन सरकारवर आसूड ओढले आहेत. “आपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या. शासनाची धोरणे आहेत गाईला वाचवा आणि बाईला नाचावा, अशा डायलॉगबाजीत भुजबळांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

भुजबळ म्हणाले, “सरकार किती हुशार, त्यांचे वकील किती हुशार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामावर बंदी आणि डान्सबारवरील बंदी उठली, महाराज बंद-डान्सबार चालू, गाईला वाचवा आणि बाईला नाचवा, पुन्हा छमछम बार हे आमचं बीजेपी सरकार”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काल जळगाव इथे परिवर्तन सभा घेण्यात आली. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, फौजिया खान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होते.