पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार – चेतन तुपे

राष्ट्रवादी शहराध्यक्ष निवडीच्या सध्या अफवाच

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे, मागील दोन दिवसांपासून महापालिका विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे संदेश सोशल मिडियावर फिरत आहेत. पण अद्याप पक्षाकडून कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, चेतन तुपे यांना विचारलं असता पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार असल्याचं सांगत, शहराध्यक्षपदासाठी आपली दावेदारी असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे वाहत आहेत, गेल्या दोन महिन्यांपासून पुणे शहराला नवीन शहराध्यक्ष मिळणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, अद्यापही पक्षाकडून कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. माजी महापौर प्रशांत जगताप, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक विशाल तांबे, सुभाष जगताप यांची नावं सध्या शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

दरम्यान, पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने प्रदेशाध्यक्षांसह सर्व वरिष्ठ नेते हे नागपूरला आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात नागपूर अथवा सुट्टीच्या दिवशी पुण्यामध्ये नवीन शहराध्यक्षाची घोषणा होवू शकते,

You might also like
Comments
Loading...