विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून घोषणांचा अवकाळी पाऊस – छगन भुजबळ

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून घोषणांचा अवकाळी पाऊस, अशी टीका भुजबळ यांनी फडणवीस सरकारवर केली.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षाचे एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हेत. विरोधी पक्षाचे सर्व आमदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तसेच अशा अनेक मागण्यासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून मागणी करत होते.

Loading...

विरोधी पक्षाचे एकही आमदार सभागृहात नसताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावरून, छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून घोषणांचा अवकाळी पाऊस पाडण्यात आला आहे, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थित अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची परंपरा पायदळी गेली आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...