फेसबुक पोस्टवर कमेंट केल्याच्या रागातून करमाळ्यात तरुणावर प्राणघातक हल्ला

shambhuraje fartade

करमाळा  (प्रतिनिधी ): फेसबुकवर दलित समाजाच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट ला कंमेट केल्याचा राग धरुन दलित समाजातील युवा कार्यकर्ता व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचा सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष सागर कांबळे याच्या सह तीस ते चाळीस युवकांनी जमाव जमवुन पत्रकार व शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष शंभुराजे शाहुराव फरतडे (रा )हिवरे ता करमाळा यांना त्यांच्या करमाळा येथील जिन मैदान मध्ये असलेल्या कार्यालयात घुसुन या घटनेचा जाब विचारत जबरी मारहाण केली आहे .कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड केली असुन विशेष म्हणजे त्यांची एक तोळ्यांची सोन्याची चैन गायब आसल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे . सागर कांबळे याच्या सह तीस ते चाळीस जणावर करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष ऋषीकेष चव्हाण (रा) निमगाव ता करमाळा यांनी संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कोणी घेतला या विषयी पोस्ट फेसबुक वर केली होती ‘ ति पोस्ट दलित समाजाच्या भावणा दुखावणारी होती , असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते ,त्या पोस्टला शंभुराजे फरतडे यांनी बरोबर अशी कमेंट केल्याने या टोळक्याने चिडुन त्यांना मारहाण केली आहे.
शंभुराजे फरतडे पत्रकार असुन शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुराव फरतडे यांचे पुत्र व शिवप्रताप युवा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत

अक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी फरतडे व चव्हान यांच्यावर गुन्हा दाखल
दलित समाजाच्या भावना दुखावनारी पोस्ट फेसबुक वर पोस्ट करणारे बजरंग दलाचे जिल्हा अध्यक्ष ऋषीकेश चव्हान आणि त्या पोस्ट ला लाईक व कंमेट करणारे शंभुराजे फरतडे व अन्य दहा जणावर दोन्ही समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधीची फिर्याद प्रविण शिवमुर्ती ओहोळ (रा) सिद्धार्थ नगर करमाळा यांनी पोलीसात दिली आहे

अद्याप कोणालाही अटक नाही
विशेष म्हणजे या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असले तरी कोणालाही अटक झालेली नाही सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक खान हे करत आहेत