fbpx

नगरमध्ये सुजय विखें विरुद्ध अरुणकाका जगताप लढण्याची शक्यता

sujay vikhe and arunkaka jagtap

टीम महाराष्ट्र देशा : मंगळवारी  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नगर दक्षिणची उमेदवारी सुजय विखेंना मिळणार हे निश्चित आहे. तर कॉंग्रेस राष्ट्रवादीतर्फे आता राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप हे सुजय विखेंविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते शंकरराव गडाख यांचे भाऊ  प्रशांत गडाख याचं नावं आघाडीवर होतं. परंतु विखे आणि गडाख यांचा राजकीय संघर्ष पाहता लोकसभेसाठी अरुणकाका जगताप यांना आयती संधी चालून आली आहे.

अहमदनगरमधील भाजपचे महत्त्वाचे नेते समजले जाणारे आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचे नातेसंबंध आहेत. शिवाजी कर्डिले यांची कन्या हि अरुण जगताप यांचे सुपुत्र आमदार संग्राम जगताप यांची पत्नी आहे. त्यामुळे जर अरुण जगताप यांना लोकसभेच तिकीट मिळालं तर कर्डिले आणि जगताप कुटुंबासमोर मोठा पेच निर्माण होणार आहे.

अरुणकाका जगताप हे नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आहेत. ते सध्या विधानपरिषदेत आमदार आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे पाटलांची गोची झाली होती. अखेर लोकसभा लढण्याचं निश्चित केलेल्या सुजय विखेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं, त्यामुळे सुजय विखेंविरुद्ध अरुणकाका जगताप याचं नावं आघाडीवर आहे.

2 Comments

Click here to post a comment