NCP | मुंबई : वेदांता पाठोमाठ नागपूरमध्ये (Nagpur) होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’(Tata Airbus Prroject) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. त्यामुळे आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. यामुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) आमदार अनिल पाटील
अनिल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील जनतेला अजित पवार यांच्यासारखे मुख्यमंत्री असावेत असे वाटत आहे. अनिल पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना सुरूवात झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असे मत राज्यातील आमदार, खासदारांचे असेल तर ते स्वाभाविक आहे. अजित पवार यांनी मागील अडीच वर्षांत चांगले काम केले. तीन पक्षाच्या सरकारला सोबत घेऊन त्यांनी उत्कृष्ट राज्यकारभार चालवला. त्यामुळे नेत्यांसह राज्यातील जनतेलाही आपल्या राज्याचा मुख्यमंत्री हा इतर राज्यांचे नेतृत्व करणारा नकोय, असे वाटत आहे. येथील जनतेला अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री असायला पाहिजे, असे वाटत आहे. राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याचा मुद्द्यावर बोलताना राज्यातील उद्योग परराज्यात जाणार नाहीत तसेच रिकामे उद्योग करणार नाही, असा मुख्यमंत्री राज्याला हवा असल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर वक्तव्य केलं आहे. तूतू-मैंमैं करण्यापेक्षा राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प कसे येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी,असं त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “मोदी आयोध्यातील श्रीरामाचे पूजन करतात अन् अनुयायी भलत्याच रामाच्या…”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- Sujay Vikhe Patil | महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या प्रकल्पावर सुजय विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Sushma Andhare | “…तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला बसावं?”; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
- Rana-Kadu | राणा-कडू वाद गोड झाला?, वर्षावर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Shahajibapu Patil | ‘कसला मर्द’ म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना शहाजीबापू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…