राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याने केले शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची गळती सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही पक्षातील नेते सेना-भाजपची वाट धरत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिंडार पडले असून नेतृत्वावर विश्वास न राहिल्याने अनेक दिग्गजांनी पक्षाला राम-राम ठोकला आहे.

सचिन अहिर, चित्रा वाघ, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. अशातच आणखी एक ज्येष्ठ नेता शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. नागपूरमधील काटोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती मात्र देशमुख यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांनी महीनाभरापूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा होती . तेव्हा सलील यांना विचारणा केली असता, त्यांनी या भेटीचा साफ इन्कार केला होता. पण तेंव्हापासून अनिल देशमुख वेगळा विचार करीत असल्याची चर्चा होती . पण आता अनिल देशमुख यांनी स्पष्ट इन्कार केल्याने या विषयावर पडदा पडला आहे .

अनिल देशमुख हे १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर सलग तिन वेळा निवडून आले. नागपूर जिल्ह्यात सतत चार वेळा निवडून येण्याचा विक्रम केवळ त्यांच्याच नावावर आहे.

काश्मीरमध्ये जमिन घेण्याची घाई का ?, शरद पवारांचा राज्य सरकारला सवाल

 

#महापूर : सांगलीच्या कारागृहात पुराचे पाणी, ३९० कैदी अडकले,दोघे पळाले

सरकार दोन समाजामध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतंय