शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीचे नेते का नाहीत ? अमोल कोल्हेचा मोठा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू केली आहे. या यात्रेत खा. कोल्हे आपल्या पक्षाला बळ देणार असून राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या भूमिका समजावून सांगत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या बहुउद्देशीय या ‘शिवस्वराज्य यात्रेत’ गटबाजी असल्याचं समोर आलं होतं. तर पक्षातील काही नेत्यांना विश्वासात व विचारात न घेता या यात्रेचे आयोजन केले असल्याची कुजबुज पक्षात सुरु असल्याचं बोललं जात होत.

मात्र , या सगळ्या बातम्यांच खंडन अमोल कोल्हे यांनी केलं आहे. शिवस्वराज्य यात्रेला कालपासून ट्रोल करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे इतर नेते कुठे आहेत अशी विचारणा केली जात आहे. मात्र त्यांना हेच सांगायचे आहे की जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड हे नेते पूरपरिस्थितीत जनतेची मदत करण्यात व्यस्त आहेत. अस अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथे स्पष्टीकरण दिल आहे.

Loading...

दरम्यान , छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावरून महाराजांचा आशीर्वाद घेऊन डॉ. अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. मात्र, या ‘शिवस्वराज्य यात्रे’तून पक्षाचे कट्टर पुरोगामी नेते जितेंद्र आव्हाड यांना लांब ठेवण्यात आल असल्याचं बोललं जातं होत. काही दिवसांपूर्वी ‘पक्षाने माझा कधी वापरच केला नसल्याची’ खंत आव्हाड यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार आव्हाड यांना शिवस्वराज्य यात्रेत टाळलं जात असल्याची चर्चा होती.

कलम ३७० हटवून ढासळलेली अर्थव्यवस्था झाकण्याचा प्रयत्न तर नाही ना ? – अमोल कोल्हे

रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या – खासदार अमोल कोल्हे

राष्ट्रवादीच्या पडत्या काळाला अमोल कोल्हे सावरणार, पक्ष श्रेष्ठींना दिला ‘हा’ शब्द

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी