जेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जुन्या आठवणीत रमतात…

अजित पवार

बारामती :  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मिश्किल टिपणी करण्यास माहीर आहेत.  तसेच राजकीय टोलेबाजी करण्यास सुद्धा अग्रेसर आहेत. बारामती एमआयडीसीतील गदिमा सभागृहात अॅॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी कौटुंबिक जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक यशाच्या मागे खूप कष्ट असतात आणि त्याच कष्टाची उजळणी त्यांची वाचली…

बंधुतत्वाच्या आठवणी सांगताना अजित पवार म्हणतात, तेव्हा आम्ही १५ ते १६ वयाचे होतो.  तो काल होता १९७५ चा. त्यावेळी अप्पासाहेबकाका आणि भाऊसाहेबकाकांनी गायी आणायच्या ठरवल्या. आणि गायी आणण्यासाठी पाठवले ते राजूदादाला (राजेंद्र पवार) आणि मला. आम्ही तीन ट्रकमध्ये २४ गायी आम्ही आणल्या.  आम्ही दोन रात्री व दोन दिवसांचा प्रवास केला.

वाटेतच आम्ही गायींचे दूध काढले, त्यानंतर ते दूध हॉटेलवाल्यांना विकले. शेण काढायचे. रस्त्याला दिसेल तेथे पाणी शेंदायचे.  आम्ही केलेले बरेच काम पवार कुटुंबीयांनी मिळविलेल्या यशामागे आहे.

Loading...

शरद पवार यांचे आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन. दुसऱ्या पिढीने देखील खूप कष्ट केले. अडचणीच्या काळातही प्रत्येकाला संस्कार देऊन शिक्षित केले. एसटीच्या प्रवासात जेवणाचे डबे विटायचे. मात्र सगळ्या काकांनी तसले डबे खाऊन आपापले शिक्षण पूर्ण केले. तिसरी पिढी म्हणून आमच्यावर प्रेशर होते. राजूदादा माझ्यापेक्षा १३ महिन्यांनी मोठा आहे. आमचे एकमेकांना सगळे माहिती आहे. त्यामुळे मी राजकारणात आल्यावर आम्ही एकमेकांचे काहीच सांगितले नाही. सर्व झाकून ठेवले.