fbpx

…तर सर्व रिक्त जागा भरून काढू – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत जात आहे त्यामुळे अनेक पद रिक्त आहेत, आणि ती भरलीही जात नाहीत. त्यामुळे आमचं सरकार येउद्या सरकार आल्यावर आम्ही सर्व रिक्त जागा भरून काढू, असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले आहे. मुंबईत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवातही केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा पराभव, बेरोजगारी, वरून भाजपवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण आपण निकालावर जास्त विचार न करता विधानसभेत पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा विचार करायला हवा. असे अजित पवार यांनी म्हंटले.

याचबरोबर, राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत जात आहे त्यामुळे अनेक पद रिक्त आहेत, आणि ती भरलीही जात नाहीत. त्यामुळे आमचं सरकार येउद्या सरकार आल्यावर आम्ही सर्व रिक्त जागा भरून काढणार आहोत असे आश्वासनही त्यांनी दिले.

इतकेच नव्हे तर, प्रकाश मेहता यांच्या नाव न घेता त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोलाही लगावला. मुख्यमंत्री स्वत:च्या मंत्र्यांच्या चुका झाकण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.

तसेच राज्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. अशावेळेस आपण सर्वांनी चांद्यापासून-बांद्यापर्यंत फिरून लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. जनाधार वाढवला पाहिजे. असे आवाहनही त्यांनी केले.