गडकरी-पवारांची भेट दिल्लीत तर राजकीय चर्चांना उधान महाराष्ट्रात

नवी दिल्ली : काल रात्री उशिरा नितीन गडकरींच्या ‘2, मोतीलाल नेहरु प्लेस’ या दिल्लीतल्या निवासस्थानी एक राजकीय वर्तुळाला चक्रावून टाकणारी भेट झाली ती म्हणजे अजित पवार आणि नितीन गडकरी यांची . अजितदादा हे नेहमी राज्याच्या राजकारणात दंग असतात तसे ते दिल्लीत खूप कमी दिसतात.

पण काल रात्री उशिरापर्यंत अजितदादा नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी होते. या दोन नेत्यांना नेमकी काय गुफ्तगू झाली हे जरी समोर आल नसल तरी पुणे आणि परिसरातील रस्ते प्रकल्पांबद्दल ही भेट असल्याची सारवासारव अजित पवार यांनी केली आहे. अजित पवारांसोबत शेकापचे जयंत पाटील सुद्धा होते.

मोदी-पवारांच्या भेटीने नेहमी गाजणारी दिल्ली काल रात्री मात्र गडकरी-अजितदादा यांच्या भेटीने गाजली.