माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तत्परतेने अपघातग्रस्तांना मदतीचा हात

टीम महाराष्ट्र देशा:- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या माणुसकीचे दर्शन अनेक वेळा महाराष्ट्राला घडले असून काल पुन्हा ते दिसून आले आहे. अपघात झाल्यानंतर मदत करण्याचे सोडून माणसं पुढं निघून जातात, साधा मदतीचा हात देखील पुढे करत नाही हे काल अजित पवार यांना दिसून आले. त्यामुळे तत्परताड दाखवत त्यांनी अपघातग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., रिपाईच्या अधिकृत उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी सायंकाळी ५ वाजता तिरोडा येथे आयोजित सभेकरीता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी नागपूरवरुन वाहनाने तिरोडा येथे जात होते. दरम्यान तिरोड्यापासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या सरांडी गावाजवळ एका इंडिका वाहनाने रस्ताच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात इंडिका कारमधील तीन जण गंभीर झाले.

याच मार्गाने तिरोडा येथे प्रचारसभेकरीता जात असलेले अजित पवार, अनिल देशमुख यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. तसेच जखमींना कारमधून बाहेर काढून आपल्या ताफ्यातील वाहनाने त्वरीत जखमींना तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिरोडा येथील कार्यकर्त्यांना फोन करुन जखमींवर वेळीच उपचार व्हावा, याची काळजी घेण्यास सांगितले.

अपघातातील तिन्ही जखमींवर तिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. प्राप्त माहितीनुसार हा अपघात अजित पवार यांच्यासमोर झाला. त्यांनी लगेच वाहन चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता ते गाडीतून उतरुन अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. पवार व देशमुख यांनी स्वत: इंडिका वाहनातील जखमींना बाहेर काढले. त्यांच्याच ताफ्यातील एका वाहनाने सर्व जखमींना तातडीने तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

You might also like
Comments
Loading...