सरकार कसे चालवायचे मोफत प्रशिक्षण द्यायला तयार – अजित पवार

Dev fadnvis and ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा: कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

काल खा सुप्रिया सुळे यांनी सरकार कसे चालवायचे याचे प्रशिक्षण अजित दादांकडून घ्यावं असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील ट्विटकरत मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामकाजावर टीका केली आहे.

‘‘कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो. राज्य शासन चालविणे आणि गरीब व शेतकऱ्यांप्रति सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रम देखील सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याच’’ ट्विट अजित पवार यांनी केले आहे .

काय म्हणाल्या होत्या खा सुप्रिया सुळे

जर एखादा विद्यार्थी एकाच वर्गात तीन – तीन वर्ष बसून अभ्यास करत असेल, आणि तरीही तो पास होत नसेल, तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज आहे. राज्यात अजित पवारांसारखी चांगली ट्यूशन कोणीच घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे ट्यूशन लावावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं होत.

तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नाहीत. मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज आहे. तेव्हा त्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना केली होती.