अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो, हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करतायत – पवार

ajit pawar vr harshvardhan patil

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे, तसेच राष्ट्रवादीकडून इंदापूरच्या जागे संदर्भात देण्यात आलेला शब्द पाळला जात नाही, असा आरोपही केला आहे. राष्ट्रवादीच्या राजकारणाला कंटाळून आपल्याला कॉंग्रेस सोडवी लागत असल्याचा आरोप पाटील यांनी केला होता.

हर्षवर्धन पाटील यांच्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो, हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करतायत. सांगायला काही नाही म्हणून राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत, अशी टीका पवार यांनी केली आहे. दरम्यान, तीन पिढ्या सरकारमध्ये मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता, आता पाटील यांना 50 ते 55 फोन केले तरी तर भेटत नाहीत, असा दावा पवार यांनी केला आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपकडून चौकश्या आणि पैशांची भीती दाखवली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ईडीची चौकशी झाल्यापासून बोलायचे कमी झाले आहेत, असं खळबळजनक विधान अजित पवार यांनी केले आहे.