मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्नही चर्चेत : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या तात्पुरत्या स्वरूपाच खातेवाटप झाल असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतही सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. आज पिंपरी चिंचवड येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. सात मंत्री अधिवेशनापुरता कारभार करु शकतात. मात्र सात मंत्री पूर्णवेळ राज्याचा कारभार पाहू शकत नाहीत. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कुणाकुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, याचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख बैठक घेऊन निर्णय घेतील. सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं आहे. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे अजित पवारांनी सांगितले.

कर्जमाफीचा निर्णय हा विधिमंडळात घेतला जातो. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीनेही पावलं टाकली जात आहेत. शेतकरी अडचणीत आहे, त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी ठोस असा निर्णय घ्यावाच लागेल. कर्जमाफीचा कितपत भार राज्य सरकार पेलू शकतं, याबाबत अभ्यास सुरु आहे, त्यानंतर सर्व प्रमुख नेते याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या संभाव्य याद्या आल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला 12 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री – एकूण 16 मंत्रिपद मिळणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॅबिनेट 11 आणि 4 राज्यमंत्री- एकूण 15 अशी मंत्रिपद मिळणार आहेत. तसेच कॉंग्रेसलाही 8 कॅबीनेट आणि 4 राज्यमंत्री – एकूण 12 मंत्रिपद मिळणार आहेत. तर गृहखात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेचं राहणार असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या