‘जे माझ्या मनात ते सांगितले मी अजित दादांच्या कानात’; खडसेंच्या कानगोष्टीने चर्चांना उधान

अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणू नका, कारण. . . .

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. याच कारण आहे ते म्हणजे या कार्यक्रमात एकाच मंचावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेते एकनाथ खडसे.

गेल्या काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच चर्चिल जात आहे. या कार्यक्रमात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश पाटील यांनी ‘नाथाभाऊ तुम्ही आमच्या पक्षात या आणि आमचे नेते व्हा’ असे आवाहन केल. याला उत्तर देताना ‘जे तुमच्या मनात आहे ते माझ्या नाही. आणि जे माझ्या मनात जे आहे ते मी अजितदादांच्या कानात सांगितलं’ म्हणत खडसे यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

पुढे बोलताना खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सल्ला देत ‘अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणू नका. कारण आपल्या नेत्याचा असा उल्लेख केला तर त्याच्यामागे चौकशींचा ससेमीरा लागतो’ म्हणत टोलेबाजी केली.