fbpx

दुष्काळमुक्तीचं स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या काळात किती गावं दुष्काळमुक्त झाली? – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा :  सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. सरकारनं सत्तेत येताच ‘जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गत गावच्यागावं दुष्काळ-टँकरमुक्तीचं स्वप्न दाखवलं. पण ५ वर्षात टँकर संख्या,फेऱ्या वाढल्याचं दिसतंय, अशी टीका अजित पवार यांनी केली.

सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी सुरु आहे. याचदरम्यान, जलयुक्त शिवार योजनेवरून अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.  सरकारनं सत्तेत येताच ‘जलयुक्त शिवार’ योजने अंतर्गत  गावच्यागावं दुष्काळ-टँकरमुक्तीचं स्वप्न दाखवलं. परंतु ५ वर्षात टँकर संख्या आणि फेऱ्या वाढल्याचचं दिसत आहे. अशी टीका अजित पवार यांनी केली.

इतकेच नव्हे तर, राज्यातील अनेक भागांमध्ये ८-८ दिवस पाणी नाही. भाजपने दुष्काळमुक्तीचं स्वप्न दाखवलं होत, तर किती गावं दुष्काळमुक्त झाली? असा सवालही त्यांनी केला. तसेच पाणलोट क्षेत्र विकास कामाच्या कंत्राटातही भ्रष्टाचार झाला, असा आरोपही पाववर यांनी केला.